हिंगणघाट: अतिवृष्टीने सोयाबीन,कापसाचे व तूर पीक नष्ट:बळीराजा संकटात, तात्काळ मदत करा: माजी आमदार प्रा तिमांडे
हिंगणघाट यावर्षीच्या खरीप हंगामात सततधार पाऊस, ढगफुटीसदृश स्थिती आणि रोगराईमुळे हिंगणघाट तसेच समुद्रपूर, सिंदि(रेल्वे) विधानसभा क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे या परिसरातील नद्यांना पूर आला, शेतजमिनी खरडून गेल्या, तर काही भागात दोन-दोन दिवस पाणी साचल्याने उभी पिके अक्षरशः नष्ट झाली आहेत तरी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे.