आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे फळ उत्पादक शेतकरी भगवान गावंडे यांनी नऊ वर्षापासून जोपासलेली सीताफळाची चौदाशे झाडांची बाग ही सीताफळाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उकडून टाकली आहे कारण सध्या दहा ते पंधरा रुपये किलो सीताफळाला भाव असून लागवड केलेला खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने आज चक्क हे सीताफळांची चौदाशे झाडे जेसीबीच्या साह्याने उखडून टाकल्याचे पाहायला मिळाली आहे.