संगमनेर: आश्वी बुद्रुक येथे भर दिवसा आठवडे बाजाराच्या दिवशी घरफोडी; दोन लाखांची चोरी
भर दिवसा आठवडे बाजाराच्या दिवशी घरफोडी; दोन लाखांची चोरी आश्वी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी भरदिवसा चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे २ लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. गावालगत झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस यंत्रणेच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी निमगावजाळी रस्त्यालगत म्हसे वस्तीवरील लक्ष्मण किसन घोडके यांच्या घरात ही चोरी झाली.