पाथर्डी: ओबीसी आरक्षणातून वेगळे राजकीय आरक्षण द्या : भटक्या विमुक्त समाजाची सरकारकडे मागणी..!
शेकाडो वर्षांपासून गावकुसाबाहेरच जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाची अवस्था आजही बिकटच आहे शेत नाही वेशीच्या आत घर नाही आर्थिक उत्पन्नाचा कोणताही शाश्वत स्रोत नाही आणि समाजात राजकीय सामाजिक सन्मान तर दूरच. लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या असलेल्या इतर जाती शेतीवर अवलंबून असताना आम्हाला मात्र जीवन जगण्यासाठी ही मूलभूत साधने नाहीत मग आम्हाला ओबीसी कसं म्हणतात असा थेट सवाल भटके विमुक्त समाजाचे अभ्यासक भरत वेटेकर यांनी मळी येथील श्री कानिटनाथ देवस्थानच्या मंगल कार्यालयात आयोजित इशारा बैठकीत