तिवसा: नागपूर रोडवर कलाकारांवर हल्ला करत लुटमार, गाडीच्या काचा फोडल्या तर मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीला नांदगाव पेठ पोलीस स्
नागपूर रोडवर कलाकारांवर हल्ला करत लुटमार केल्याची घटना घडली असून गाडीच्या काजा फोडल्या नंतर त्यांना बाहेर काढून लुटमार केला व जवळील संपूर्ण मुद्देमाल त्यांनी लंपास केला त्या संदर्भात नांदगाव पेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे 112 वर कॉल केल्यानंतर नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली. अकोला येथून कार्यक्रम करून येथे महिला आणि पुरुष कलाकार जात होते यावेळी ही घटना घडली या संदर्भात तपास पोलीस करत आहे.