समुद्रपूर: मंगरूळ येथील दलीत शेतकऱ्याची शेती दडपणाऱ्यांवर आळा घाला; बहुजन समाजवादी पार्टीचे नेते तेलंग यांची तहसीलदारांकडे मागणी
समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ मौजा शिवारात असलेल्या दलित कुटुंबाच्या शेती हडपण्याचा डाव सध्या काही लोकांकडून केला जात असून हा प्रकार अतिशय निंदनीय आहे यामुळे तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार निर्मूलन कायदे अंतर्गत कारवाई करण्याची मागणी बहुजन समाजवादी पार्टीचे नेते प्रलय तेलंग यांनी निवेदनातून समुद्रपूर येथील तहसीलदाराकडे केली आहे.