वर्धा: छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान व दिव्यांग बांधवांना घरपोच धान्य वितरण: जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम: आष्टी येथे वितरित
Wardha, Wardha | Sep 22, 2025 वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा केला जात आहे.या पंधरवड्यामध्ये, आष्टी येथे दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे रेशनचे धान्य त्यांच्या घरी जाऊन पोहोचवले जात आहे. असे आज 22 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता दिलेल्या प्रसंगी पत्रकात कळलेले आहे