तळोदा: तळोदा उपकोषागार कार्यालय येथे लाचखोर कनिष्ठ लिपिक २४०० रू.ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील उपकोषागार कार्यालय येथे कार्यरत कनिष्ठ लिपिक भैरवनाथ मोरे यास १७ सप्टेंबर रोजी कार्यालय परिसरात २४०० रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.