गोरेगाव: मुंडीपार येथे ऑटो उभा करून वाहतुकीस अडथळा, गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल
गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम मुंडीपार येथील बस स्थानक चौकात सार्वजनिक रस्त्यावर आरोपी राजेंद्र रोकडे यांनी ऑटो क्रमांक एमएच 35 के 1520 ला धोकादायकरित्या उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. दिनांक दोन नोव्हेंबर रोजी रविवारला सकाळी पोलीस शिपाई लीलाधर चुटे व सहाय्यक फौजदार मुनेश्वर राऊत यांनी कारवाई करून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.