जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि न्याय्य मागण्यांसाठी संघर्षाचा पवित्रा घेत, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा भंडाराचे आठवे जिल्हा अधिवेशन जिल्हा नियोजन भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनाच्या निमित्ताने संघटनेच्या सामर्थ्याचे दर्शन घडले असून, आगामी काळासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यात जिल्हाध्यक्षपदी निमिश सिद्धार्थ गेडाम यांची निवड करून त्यांच्या खांद्यावर संघटनेची महत्त्वपूर्ण धुरा सोपवण्यात आली आहे.