वाशिम: कोइम्बतूर जंक्शन ते मदार जंक्शन (अजमेर) विशेष गाड्या नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावणार
दक्षिण रेल्वे ने कोइम्बतूर जंक्शन ते मदार जंक्शन (अजमेर जवळ ) विशेष गाडीच्या 08 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे : 01. गाडी संख्या 06181 कोइम्बतूर जंक्शन ते मदार विशेष गाडी : हि गाडी कोइम्बतूर जंक्शन येथून दर गुरुवारी दिनांक 13.11.2025 ते 04.12.2025 दरम्यान सकाळी 02:30 वाजता सुटेल आणि इरोड, रेनिगुंटा, कुर्नूल, काचीगुडा कामारेद्दी, निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, भुसावळ, सुरत, वडोदरा, रतलाम, निमच, अजमेर मार्गे मदार येथे पोहचेल