अंबरनाथ: बदलापूर मध्ये आज पुन्हा शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडले, व्हिडिओ आला समोर
बदलापूर मध्ये आज नगरपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे.मात्र मतदानाच्या पहिल्याच दिवशी बदलापूर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बदलापूरच्या गांधीनगर टेकडी येथे भाजप आणि शिंदे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि जोरदार राडा झाला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मतदान केंद्रावर फौज फाटा वाढवला. मात्र हा प्रकार घडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.