कारंजा: आजणडोह येथे तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारंजा पोलिसांनी केली कार्यवाही
Karanja, Wardha | Oct 16, 2025 आजनडोह येथे हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या इसमास कारंजा पोलिसांनी ताब्यात घेऊन कार्यवाही केल्याची घटना दिनांक 15 तारखेला दुपारी एक ते एक चाळीसच्या दरम्यान घडली प्रणय उर्फ पिंटू उकडराव रमधाम वय 32 वर्षे राहणार आजणडोह तालुका कारंजा जिल्हा वर्धा असे आरोपीचे नाव आहे या संदर्भात पोलिसांनी अपराध क्रमांक 07 09/2025 कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असून तपास सुरू असल्याची माहिती आज दिली