जुनी कामठी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वारीसपुरा येथे दुचाकीने नायलॉन मांजा विक्रीकरिता नेत असलेल्या इसमाला ताब्यात घेतले. अटकेतील आरोपीचे नाव मोहम्मद आसिफ मोहम्मद फारुख वय 25 वर्ष असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून एक दुचाकी आणि नायलॉन मांजा असा एकूण एक लाख आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.