चाळीसगाव: चाळीसगाव येथे श्री सर्वेश्वर महादेव मंदिराचे भूमिपूजन उत्साहात; १० ते १२ हजार जनसमुदायाची उपस्थिती
चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र श्रावण तळे, राजदेहरे येथे आज, सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता श्री सर्वेश्वर महादेव मंदिराच्या भूमिपूजन समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला मा. आमदार श्री. मंगेश चव्हाण (चाळीसगाव) आणि मा. आमदार श्री. रमेश बोरनारे (वैजापूर) यांची विशेष उपस्थिती लाभली.