रामटेक: खिंडसी जलाशय 'ओव्हरफ्लो ' ; सांडव्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Ramtek, Nagpur | Sep 28, 2025 रामटेक जवळील खिंडसी जलाशय 100% च्या वर भरल्याने रविवार दि. 28 सप्टेंबर ला सकाळी 6 वा पासून या जलाशयाच्या ग्रा. पं. पंचांळा च्या बाजूने असलेल्या पाळीवरुन पाणी वाहू लागले आहे. पुढे सांडव्यातून वाहणारे पाणी सूर नदीतून वाकेश्वर, कोदामेंढी मार्गे पुढे जात आहे. पंचांळा सहित पुढील सर्व गावांना प्रशासना द्वारे इशारा देण्यात आला आहे.