खंडेरायाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथील खंडोबा- म्हाळसादेवी,सच्चिदानंद बाबा व नारदमुनी या नव्या मंदिरासह पुरातन मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. "येळकोट येळकोट जय मल्हार" च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता.चंपाषष्ठी निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसा मंदिर प्रांगणात यात्रा भरली होती.