नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.