नवापूर: नवापूर शहरातून वाहणाऱ्या रंगावली नदीने धोक्याची पातळी ओलांडली
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातून वाहणारी रंगावली नदीने आज धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रंगावली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी काठावरील १२ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.