नाशिक दि. २१: जग भरातील सर्वच देशावर आपले वचर्र्स्व निर्माण करण्याच्या अमेरीकेच्या मनोवृत्तीमुळे गेली ७५ वर्ष इतर सार्या देशातील नागरींक अस्वस्थ जिवन जगत आहेत.असे प्रतीपादन प्रख्यात व्यवस्थापन तज्ञ, लेखक दीपक करंंजीकर यांनी आज येथे केले. औरंगाबादकर सभागृहात सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंंथालय महोत्सवाचे दुसरे पुष्प आज हुतात्मा अनत कान्हेरे स्मृती व्याख्यानाते करंंजीकर यांनी अस्वस्थ शतकाचा वेध या विषयाने गुंफले. त्यावेळी ते बोलत होेते.