शिरजगाव कसबा सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार, यांनी देवगाव ते गोटापूर वस्तापूर रस्त्याला भेट देऊन नुकत्याच डांबरीकरण केलेल्या कामाची पाहणी केल्याची माहिती आज दिनांक 27 डिसेंबरला दुपारी तीन वाजता प्राप्त झाली असून, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने याबाबतीत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पत्र देऊन माहिती देणार असल्याचे सुखदेवराव पवार यांनी सांगितले