हिंगोली जिल्ह्याच्या पांगरा शिंदेत भूकंपाचे सत्र सुरूच! सततच्या हादऱ्यांची सवय, पण ग्रामस्थांत भीती कायम भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असून, मंगळवारी १८ नोव्हेंबर सकाळी पुन्हा एकदा पांगरा शिंदे परिसरात भूगर्भातून जोरदार आवाज येत जमीन हादरल्याची घटना घडली. गेल्या सात वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने, परिसरातील नागरिकांना हे धक्के आता अंगवळणी पडले आहेत. जमीन हादरली किंवा आवाज आला तरी, 'हे तर सततचेच' म्हणत नागरिक लगेच विसरून दैनंदिन कामात गुंतू जात आहेत.