बुलढाणा: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि सरसकट आर्थिक मदत जाहीर करा - शेतकरी नेते रविकांत तुपकर
बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे, सिंदखेड, लपाली, पिंपळगाव, लिहा, आव्हा, वाडी, कोल्ही गवळी, कोल्ही गोलर, रिधोरा देवीसह अनेक गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. मागील मदतीत मोताळ्याची केवळ १२ गावे होती. मात्र, आता नुकसानीची व्याप्ती खूप मोठी आहे.