कळमनूरी: 5 वर्षाच्या पोटच्या मुलासह एका मातेने खरवड शिवारात आत्महत्या केल्या प्रकरणी पोलिसात मयत मातेवर गुन्हा दाखल
पुसद येथील ज्योती सागर सावळे वय 30 वर्षे हिने आपल्या पोटचा पाच वर्षाचा मुलगा राजवीर सावळे यास सोबत घेऊन कळमनुरी तालुक्यातील खरवड या ठिकाणी तलावात आत्महत्या केल्यानंतर दि 6 नोव्हेंबर रोजी मृतदेह आढळून आला होता .तिने सासरी झालेल्या किरकोळ रागाच्या वादातून मुलगा राजवीरला सोबत घेऊन तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे मिलींद मुळे यांनी तक्रारीत नमूद करून दिलेल्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात मयत मातेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि. 9 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .