कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस, वनविभाग यांनी संयुक्त कारवाई करत शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याचा केला बचाव
दिनांक 19 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत मोजा दहेगाव येथील शेतात विहिरीत बिबट्या अडकून पडल्याची माहिती प्राप्त होतात पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे प्रभारी अधिकारी कळमेश्वर आणि त्यांचे अंमलदार वनपरिक्षेत्र अधिकारी कळमेश्वर प्रवीण शिरपूर आणि त्यांचे पथक तसेच नागपूर येथील वन विभाग रेस टू टीम यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनीही मोलाची कामगिरी बजावली