अकोट: शहरात मोकाट जनावरांची वाढली समस्या पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा#Jansamasya
Akot, Akola | Nov 1, 2025 शहरात मोकाट जनावरांची समस्या वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील मुख्यमार्गांवर मोकाट जनावरांचा उपद्रव असल्याने बऱ्याचदा वाहतुकीला देखील अडथळे निर्माण होत आहेत तर शहरात मोकाट जनावरांसह भटक्या श्वानांची वाढलेली संख्या ही नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. भटके श्वांन तर लहान मुलं व वृद्धांवर हल्ले करण्याच्या घटना देखील घडत असल्याने शहरवासी चिंतेत आहेत.पालिका प्रशासनाने मोकाट जनावर व भटक्या कुत्रांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.