चंद्रपूर: तहसील कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर तहसील कार्यालय येथे सकाळी 7 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे, नायब तहसीलदार प्रियंका मानकर, आदींची उपस्थिती होती.अनेक आव्हानांचा सामना करत महाराष्ट्र देशातील अव्वल क्रमांकावर आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, शेती, क्रीडा, परंपरा, तंत्रज्ञान या सर्वच बाबतीत महाराष्ट्रानं नेत्रदिपक कामगिरी केली असल्यासाचे मत जोरगेवारांनी व्यक्त केले.