भिवंडी: भिवंडी कोनगाव परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
Bhiwandi, Thane | Nov 21, 2025 भिवंडी कोनगाव परिसरामध्ये भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरातील अनेक ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या होत असून रहिवाशी वस्तीमध्ये भर दुपारी शिरून चोरी करण्याची हिम्मत चोरटे करत आहेत. अशीच घटना भिवंडी कोनगाव परिसरातील एका इमारतीत घडली आहे. दुचाकीवरून दोन चोरटे आले आणि दुसऱ्या दुचाकीवर ठेवलेले दुचाकीचे महागडे कव्हर आणि इतर काही वस्तू घेऊन घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आ