राहुरी: गोटुंबे आखाडा येथे स्मार्ट मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध , काही काळ तणाव
राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. “स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढेल, तसेच चुकीचे रीडिंग दाखवले जाण्याची शक्यता आहे,” असा आरोप करत नागरिकांनी काम थांबवले. त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.