नवापूर: कोंडाईबारी घाटात पुन्हा भीषण अपघात, कंटेनर पलटी चालक गंभीर सहचालक किरकोळ जख्मी
नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट परिसरात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. विसरवाडीच्या दिशेने येणारा कंटेनर (क्र. एचआर 38 एसी 3645) समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला पलटी झाला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आणि सहचालक किरकोळ जखमी झाला.