भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ७५२ एच वर बाजरी फॉर्म जवळ घडली. रूपम भगवान मतसागर वय २४ वर्षे राहणार जरूळ असे घटनेतील जखमी व्यक्तीचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसा रूपम हे दुचाकीवरून जात असताना भरधाव कारने रविवारी सायंकाळी बाजरी फार्म जवळ धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले उपस्थितांनी रूपम यांना तात्काळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.