एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील भऊर शिवारात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दिनेश गोकुळ जगताप वय 22 वर्षे राहणार भऊर असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनेश याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्याला उपस्थितांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दाखल केले.येथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणात वैजापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.