परळी: सेलू पाटी येथे कार-दुचाकीचा अपघात;एकजण झाला ठार
Parli, Beed | Oct 7, 2025 परळी तालुक्यातील सेलू पाटी येथे झालेल्या अपघातात नितीन अर्जून चोपडे, वय २५ वर्षे, रा. साळेगाव ता. माजलगाव या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.ही घटना सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. परळीहून सिरसाळ्याकडे दुचाकीवर जात असताना, मागून आलेल्या कारने धडक दिली.अपघातानंतर कार चालक पसार झाला. स्थानिकांनी जखमी युवकास अंबाजोगाई रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.