पातुर: पातुर बाळापूर विधानसभा क्षेत्रातील वाडेगावात घरकुल मस्टर रकमेची लूट; संगणक चालकाकडून पैशांची कबुली, ग्रामस्थ संतप्त
Patur, Akola | Dec 2, 2025 पातूर बाळापूर विधानसभा मतदारसंघात वाडेगाव ग्रामपंचायतीत घरकुल लाभार्थ्यांच्या मस्टर रकमेची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रमाई आवास योजनेचे लाभार्थी राधेश्याम कळसकार यांच्या जॉब कार्डवरील ३५६४ रुपयांची रक्कम ग्रामपंचायतचे संगणक चालक शशिकांत राहणे यांनी परस्पर घेतल्याचा आरोप असून, लाभार्थ्यांच्या चौकशीनंतर त्यांनी पैसे घेतल्याची कबुली देत ती ऑनलाईन परत केली. यापूर्वीही अनेक लाभार्थ्यांना मस्टरचे पैसे न मिळाल्याची प्रकरणे चर्चेत होती. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहेत.