जळगाव: "आघाडीसाठी प्रयत्न सुरू, अन्यथा स्वबळावर लढणार !"; महापालिकेत काँग्रेसचा 'प्लॅन बी' तयार
जळगाव महापालिका निवडणूकीसाठी आज काँग्रेस पक्षाकडून काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेश उपाध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आघाडी होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून नाहीतर आम्ही ३७ जागांवर स्वबळावर लढविण्याची तयारी देखील आहे अशी प्रतिक्रीया काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता माध्यमांशी बोलतांना दिली आहे.