मावळ: आमदार रोहित पवारः-शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी याकरिता देहू येथे लाक्षणिक उपोषण..
Mawal, Pune | Oct 20, 2025 जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी त्याकाळी सरसकट कर्जमाफी केली होती. या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देहू येथे उपोषण केले आहे. राज्यात अतिवृष्टी, पुर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी एक दिवसांच लाक्षणिक उपोषण सुरू केल्याचं म्हटलं.