चामोर्शी: बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्य जनजातीय गौरव दिवस उत्साहात साजरा
गडचिरोली : चामोशी तालुक्यातील अड्याळ येथील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेत भगवान बिरसा मुंडा १५० व्या जयंतीनिमित्य जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला आदराने स्मरण करून त्यांना आदरांजली वाहीली . या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव विश्वजीत मारोतराव कोवासे उपस्थित होते.