दारव्हा: शहरातील बस स्थानकासमोर उबाठा शिवसेना पक्षाचे रस्ता रोको आंदोलन,उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
दारव्हा शहरातील बसस्थानक समोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दि. ८ ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता दरम्यान उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे यांच्या नेतृत्वात भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा तसेच प्रत्येक शेतकऱ्याला ५०,००० अनुदान मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.