भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योग यांनी गाळप हंगाम सन २०२५–२६ साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन ३,३५० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सोमवारी सायंकाळी सहा वाजता कारखान्याचे संचालक तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खा.नितीनकाका पाटील यांनी जाहीर केला. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योग लि. या दोन्ही कारखान्यांसाठी समान ऊस दर जाहीर केला.