गडचिरोली: कबुतर चोरल्याच्या कारणावरून आमगाव येथे चार मुलांना बेदम मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल व्हायरल व्हिडिओ
कबूतर चोरल्याचा संशयातून चार चिमुकल्या बालकांना बेदम मारहाण केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे आठ दिवसांपूर्वी घडली. या घटनेबाबतचा व्हिडिओ सोमवार 5 ऑगस्ट रोजी समाज माध्यमांवर व्हायरल होतात हे प्रकरण उघडकीस आल्याने देसाईगंज शहरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.आरोपी हा देसाईगंज शहरात वास्तव्यास असून त्याचे आमगाव येथे घरबांधकाम सुरु होते. दरम्यान आमगाव येथील बांधकाम होत असलेल्या ठिकाणचे कबूतर चिमुकल्यांनी चोरले असा संशय व्यक्त करत मारहाण केली