भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दि. २६ डिसेंबर रोजी टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू व जुगाराचे १० अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत. यात १० आरोपींच्या ताब्यातून ११ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर आरोपींवर साकोली, अड्याळ, भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी व लाखांदुर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक २७ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता दरम्यान एका...