जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पक्षीजगताविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बुधवार दि.11 मार्च 2026 रोजी शहरात पहिल्यांदाच विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंगळवार दि. 10 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हैया नगर येथील वन प्रशिक्षण विद्यालयात हा उपक्रम पार पडणार आहे. जिल्ह्यातील पक्षप्रेमींनी सहभागी व्हावे.