वैजापूर: करंजगाव शिवारात महामार्गालगत झुडपात बेवारस आढळलेल्या गाडीला मूळ मालकाला केले सुपूर्द
वैजापूर तालुक्यातील करंजगाव शिवारात मुंबई नागपूर महामार्गालगत झुडपात बेवारस गाडी उभी असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी करंजगाव येथील पोलिस मित्र रवी मोकळे यांनी पोलिस पाटील कारभारी निघोटे यांना कळविले.पोलिस पाटलांनी याबाबत वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्याशी संपर्क साधून घटने बाबत माहिती दिली दरम्यान पोलिस निरीक्षक ताईतवाले यांनी अन्य ठाण्याची संपर्क साधत माहिती दिली तेव्हा मूळ मालकाशी संपर्क साधून गाडी सुपूर्द करण्यात आली.