नेरला येथील पुरुषोत्तम पाल यांच्या गाईवर चराईवरून घरी परतत असताना वाघाने अचानक हल्ला करून तीला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच अड्याळ वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. परिसरात वाघाचा वावर वाढत असल्याने ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, तसेच एकटे जाणे टाळावे, असा इशारा वन कर्मचाऱ्यांनी दिला आहे.