बुलढाणा: काँग्रेस पक्ष पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून, सरकारने दिलासा द्यावा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मका व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून, या पुरामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढवलं आहे.