हिंगणघाट: नांदगाव येथील गोठ्यातून अज्ञात चोरट्याने पळविल्या लहानमोठ्या ८ बकऱ्या:शहर पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथील गोठ्यातून अज्ञात चोरट्याने १७ हजार रुपये किमंतीच्या ८ लहान मोठ्या बकऱ्या चोरून नेल्याची माहिती ९ पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार नांदगाव येथील सुजाता सुधाकर कांबळे शेत मजुरीचे काम व बक-या चरण्याचे काम करते त्यांच्याकडे लहान मोठ्या एकुण 30 बक-या असुन त्या बक-या रोज चारण्याकरीता नेते त्याच्या राहते घराचे थोड्या दुर अंतरावर एक जुने घर सारखा बंडा असुन त्या ठिकाणी मी माझ्या बक-या बांधत असते.याठिकाणावरून ८ बकऱ्या चोरून नेल्या