नंदुरबार: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर उपद्रवींचा हल्ला, हल्ल्यात महिला जख्मी; रायसिंगपुरा परिसरातील घटना
शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या घरावर उपद्रवींचा आज सायंकाळी घरात घुसून हल्ला केल्याची घटना घडली आहे. चाकून घरातील महिलेवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात उपद्रवींनी घरातील वस्तूंची तोडफोड केली आहे. घरातील पुरुष मंडळी दुखद घटनेच्या ठिकाणी बाहेर गेले असल्यामुळे घरात केवळ महिला होत्या. या अचानक घडलेल्या हल्ल्यामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात अचानक पळापळ सुरू झाली. घटनेची माहिती कळताच पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.