नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 – 26 करीता दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वा. या कालावधीत मतदान होत असून दि. 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी होत आहे. दि. 14 जानेवारी 2026 रोजी सकाळ पासून आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र व मतदान केंद्रावरील साहित्य वितरण केले जाणार असून दि. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतदान साहित्य स्विकृती होणार आहे. या सर्व कार्यालयामधील स्ट्रॉंग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे सिलींग करुन ठेवण्यात आलेली आहेत.