शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम उद्योग आणि तुती लागवड बैठक
Beed, Beed | Oct 18, 2025 गेवराई शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज शनिवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता, रेशीम उद्योग आणि तुती लागवड विषयावर बैठक पार पडली.या बैठकीस जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन, आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी प्रस्तावित रेशीम पार्कची पाहणी केली.या बैठकीमुळे गेवराई तालुक्यातील रेशीम उद्योगाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.