सार्वजनिक मालमत्तेची चोरी करण्याच्या नादात चोरटे किती थराला जाऊ शकतात, याचा भयंकर प्रकार पवनी शहरातील घोडेघाट वॉर्डात उघडकीस आला आहे. हायमास्टचे महागडे दिवे चोरण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी ते खाली उतरवले, मात्र चोरी करण्यात अपयश आल्याने ते दिवे तसेच वाऱ्यावर लटकत सोडून चोरटे पसार झाले. नगराध्यक्ष डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर ठाकरे यांच्या समयसूचकतेमुळे हा प्रकार वेळीच उघड झाला आणि एक मोठी संभाव्य दुर्घटना थोडक्यात टळली.